क्राईम बिट

जहांगीरपुरीतील ‘त्या’ आरोपींची ओळख पडतली, तब्बल ३०० जण होणार अटक

Share Now

दिल्लीतील जहांगीरपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुकीत दगडफेक झाल्यामुळे हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत सुमारे ३०० आरोपींची ओळख पटवली आहे. या ओळख पटवलेल्या आरोपींच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने या आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खत अनुदानात सुधारणा करण्याच्या तयारीत

जहांगीरपुरीतील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत अन्सार, अस्लम, सोनू चिकनासह २६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत तपासात सुमारे ३०० आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरु आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत गुन्हे शाखेकडून वेगवान कारवाई सुरु करण्यात आली आहे.

हे ही वाचा (Read This) कोरोना रुग्णाची संख्या वाढतेय ? यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे काय म्हणाले…

तसेच या हिंसाचाराशी संबंधित ३० फोन नंबर तपासण्यात येत असून हे ३० नंबर अन्सार, अस्लम आणि सोनूशी संबंधित असल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्ली पालिकेकडून या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्यानंतर आज, २० एप्रिल रोजी मोठ्या संख्येने जेसीबी, ट्रक्स आणि पोलीस या भागात जमा झाले असून घरांवर, दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *