हॉटेल मधील थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन फक्त रात्री १२ पर्यंत – राज्य शासनाचा निर्णय
गतवर्षी प्रमाणे यंदाचं नवीन वर्षाचं स्वागत कोरोनाचे नियम पाळून आणि राज्य सरकारने दिलेलं निर्बंध पाळून साजरी करायच आहे. काल पासून लागून झालेल्या नियमात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यत संचारबंदी लावण्याचे आदेश काढले असून रात्री ५ व्यक्तीना एकत्र फिरण्यास मनाई केली आहे.
हॉटेल मध्ये देखील आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहिले होते की, ३१ डिसेंबर रोजी पहाटे पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, परंतु या गृह मंत्रालयाने हॉटेल चालकांची परवानगी नाकारली असून, रात्री १२ पर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून हॉटेलमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना उपस्थिती अनिवार्य आहे.
यावर राजेश टोपे यांनी सांगितले की, निर्बंध लक्षात घेऊन हॉटेल चालू ठेवायला हरकत नाही, हॉटेल चालकांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.