उद्या बंडखोर आमदार असतील महाराष्ट्रात, होईल शिरगणती
सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय अस्थिरते मुळे आणि सत्ताधारी आमदारांनी बंडखोरी केल्या मुळे राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे, दरम्यान राज्यपाल भगतसिह कोषारी यांनी विधानसभा सचिवांना पात्र लिहले आहे. त्यात येत्या २४ तासात शिरगणती करून लवकरात लवकर ‘फॉलोर टेस्ट’ घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करा असे आदेश दिले आहे. त्यावर आता उद्या सगळे बंडखोर आमदार मुंबईत असेल.
तसेच, आमदारांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था हि राज्य सरकारची जबाबदारी असेल असे सांगण्यात येत आहे. सध्या गुवाहाटीतून आमदार आता सुरत किव्वा गोव्याला जातील आणि तिथून सकाळी १० वाजता मुंबईत येतील. गुवाहाटीतून काही वेळात (सकाळी ११ वाजे पर्यंत) दोन बस रेडिसन ब्लु हॉटेल वरून पहिले कामाख्या देवीचे दर्शन घेऊन विमान तालावर जातील आणि गोवा किंवा सुरतला जातील. जास्तीत जास्त शक्यता आमदार गोव्यत जाण्याची आहे. ७१ रूम एका हॉटेल मध्ये बुक झाल्याचे देखील वृत्त समोर येत आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, राज्य सरकारच्या अडचणीत वाढ
जन धन खातेधारकांना दरमहा मिळणार 3000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
काय आहे राज्यपालांचे आदेश?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीच्या घटनेच्या ताज्या वळणात, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्या सकाळी 11 वाजता राज्य विधानसभेत ‘फॉलोर टेस्ट’ घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवून उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. एक दिवस अगोदर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन फ्लोअर टेस्टचा आग्रह केला होता.
- बहुमत सिद्ध करण्यासाठी विशष अधिवेशन बोलवण्यात येईल.
- २४ टेस्ट बहुमत सादर करा.
- शिरगणतीने ‘फॉलोर टेस्ट’ होईल.
- आमदारांची सुरक्षा राज्यसरकाची जबाबदारी असेल.
- संपूर्ण आधिवेशनाची व्हिडिओग्राफी होईल.
असे आदेश राज्यपालानी विधानसभा सचिवांना दिले आहे.