सिनेमागृहाला ओटीटी प्लॅटफॉर्मची टस्सल ! पण अस्सल मनोरंजन कोणते ?
सिनेमागृहाला ओटीटी प्लॅटफॉर्मची टस्सल !
पण अस्सल मनोरंजन कोणते ?
लोकडाऊन काळाने आपल्या आयुष्यात केलेल्या अनेक बदलांमध्ये एक मोठा बदल केलाय तो म्हणजे सिनेमागृहासाठी नवा पर्याय दिलाय. मनोरंजन क्षेत्रात तर ही नवी क्रांती ठरली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ने धूम करून टाकली आहे. कलाकारांना संजीवनी मिळाली तशी मनोरंजन क्षेत्रालाही चालना मिळाली आणि रसिकांना नवं दालन खुलं झालं. आजच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय होत आहेत. आजचा तरुण वर्ग या प्लॅटफॉर्म ना खूप जास्त महत्त्व देत आहेत.
ओटीटी ची लोकप्रियता पाहता खूप चित्रपट हे सिनेमा गृहाच्याच्या ऐवजी ओटीटी अँप वर प्रदर्शित होत आहेत. हा प्लॅटफॉर्म काय आहे आणि एवढी चलती का हा प्रश्न बहुतेकांना पडलाय. मुळात ओटीटी हा शॉर्ट फॉर्म आहे, पूर्ण नाव आहे ओव्हर द टॉप. इंटरनेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना हवे ते हवे तेव्हा बघता येते. ही सुविधा म्हणजे प्रेक्षकांना स्वातंत्र्य आहे कधी आणि काय बघायचे.
ओटीटी वर तुम्हाला नवीन प्रदर्शित चित्रपट, वेब सीरिज किंवा अन्य मीडिया कंटेंट पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचे झाले तर ओटीटी ही Video Streaming Service आहे. अमेरिकेत ह्याला खूप मागणी आहे. गेल्या काही वर्षापासून भारतात ओटीटी सर्व्हिस ला मागणी वाढत आहे. विशेषज्ञांच्या माहितीनुसार येणाऱ्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर व त्यावरील कंटेंट खूप जास्त प्रमाणात पाहिले जाऊ शकतात.
ओटीटी अँपवर वेब सीरिज, चित्रपट पाहू शकतो. हे ओटीटी अँप मोबाईल वर किंवा स्मार्ट टीव्ही वर सुद्धा डाऊनलोड करून वापरता येतात.
आजकाल खूप ओटीटी अँप तसेच ओटीटी Platforms उपलब्ध आहेत. काही ओटीटी ऍप हे त्यांच्या वेब सीरिज मुळे लोकप्रिय होत आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा ओटीटी ऍप वर ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज, नवीन चित्रपट तसेच जुने चित्रपट, डॉक्युमेंट्री इत्यादी बघू शकतो. हे बाकी कुठेही उपलब्ध नसतात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असतात.
गेल्या काही वर्ष पासून अनेक ओटीटी सुविधा पुरविणाऱ्या अनेक कंपनी आहेत, Netflix, Amazon Prime Video, HBO Now, Sling, Hulu, Disney Hotstar, Sony Liv, VOOT, Jio Cinema असे कितीतरी पर्याय उपलब्ध झाले आहेत. या कंपन्या स्वतःचे ओरिजनल कंटेंट, वेब सीरिज तसेच चित्रपट बनवत आहेत.ओटीटी सर्व्हिस प्रेक्षकांसाठी खूप सोयीची आहे. लोक त्यांच्या सोयीनुसार हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी ओटीटी ऍप चा वापर करू शकतात. ओटीटी ऍप जसे की स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, स्मार्टफोन, चित्रपट व ओरिजनल कंटेंट बघितले जाऊ शकतात.