तरुणीने केली आसाराम बापूच्या शिष्या विरुद्ध तक्रार, कॉल गर्ल म्हणून करत होता तरुणीची बदनामी
औरंगाबाद शहरातील एका तरुणीचे फेक प्रोफाइल बनवून, चक्क ‘कॉलगर्ल’ असे त्या प्रोफाइल बद्दल लिहिले. या प्रकरणा बद्दल मध्य प्रदेशातील पोलिसांनी एका इसमाला पकडलं असून तो मूळचा ओडिशा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस या आरोपीच्या शोधात होते. अखेर मध्य प्रदेश पोलिसांनी छिंदवाडा येथे या इसमाला ताब्यात घेतले. हा इसम आसाराम बापू यांचा शिष्य असल्याचे उघडकीस आले आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, एका वेबसाईटवर त्या तरूणाने औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या तरुणीचा फोटो, फोने नंबर असे टाकून कॉल गर्ल असे टाकले होते. काही दिवसातच हा प्रकार मुलीच्या लक्षात आला. तिला अज्ञात व्यक्तींचे फोन येत होते, यावर तिने पोलिसात तक्रार केली. याचा तपस करत असताना मध्यप्रदेश पोलिसांनी आरोपी छिंदवाद येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी दारम्यन तो आसाराम बापूचा शिष्य असल्याचे त्याने सांगितले, तो एका आश्रमात आचार्य म्हणून काम करतो असे त्याचा दावा आहे.