देश

भारत- चीन सीमेवर आता भारतीय सैन्यातील महिलांचीही बारीक नजर

Share Now

भारतीय हवाई दलात महिलांची संख्या वाढत असतानाच भारत- चीन सीमेवर भारतीय महिला वैमानिक विमान आणि हेलिकॉप्टर उडवत देशाचं संरक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. आसामजवळील भारत- चीन सीमेवर फायटर जेट उडवत महिला पायलट देशाचं संरक्षण करत आहेत. मंगळवारी आसाममध्ये तीन महिला वैमानिकांनी लढाऊ विमानं उडवत शत्रूली आपली ताकद दाखवून दिली आहे.

डीमॅट अकाउंट लॉगिन ते क्रेडिट, डेबिट कार्डचे नियम बदलणार, जाणून घ्या या 5 गोष्टी

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलातील महिला वैमानिकांनी तेजपुर येथील हवाई तळावरून सुखोई- ३० या आधुनिक लढाऊ विमानातून उड्डाण घेत अरुणाचल प्रदेश, आसाम येथील भारत- चीन सीमेवर टेहळणी केली आहे. चीनने काही कुरघोडी केल्यास त्याला उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असा इशाराच या महिला वैमानिकांनी दिला आहे.

राज्यात पावसामुळे कापूस पिकाचे मोठं नुकसान,अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी संकटात

भारतीय हवाई दलात १ हजार ४०० हून अधिक महिला अधिकारी आज कार्यरत आहेत. त्या ग्राउंड ड्यूटी तसेच एयर ट्राफिक कंट्रोल विभाग, शस्त्रास्त्र प्रणाली विभाग येथे कार्यरत आहेत. या सोबत अत्याधुनिक लढाऊ विमाने देखील आता महिला वैमानिक चालवत आहेत. भारतातील एकमेव Su-30 MKI वेपन ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी यांनी सांगितलं की, ‘आमच्या आधी काही हुशार महिला होत्या ज्यांनी मर्यादा तोडली आणि आमची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला. पूर्वेकडील क्षेत्रात आमचे पायलट्स कोणत्याही प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत.’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *