पत्रकारितेचा आवाज हरपला, प्रदीप भिडे यांचे निधन
एक नाटकार, साहित्य प्रेमी, निवेदक तसेच “नमस्कार मी प्रदीप भिडे” म्हणत आपल्या वेगळ्या शैलीत आणि बुलंद आवाजात वृत्तनिवेदन करणारे प्रदीप भिडे हे आज काळाच्या पडद्या आड गेले. भिडे यांनी त्यांच्या सयाद्री वाहिनीत केलेल्या कारकीर्तीमध्ये अनेक महत्वाच्या बातम्यांचे निवेदन केले, त्यांनी केलेल्या अनेक बातम्यांचे निवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात रुजले आहे, २१ वर्षाचे असताना असताना त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले करियर सुरु केले. तब्बल ४२ वर्ष त्यांनी संयाद्री वाहिनीसाठी निवेदन केले आणि वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला.
(नोंदणी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022: नवीन ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती
नाटकात देखील त्यांना रस होता, रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केलं होतं. स्वत:च्या आवाजावर त्यांनी आर्थिक प्राप्ती करण्याच्या निर्णय घेतला आणि ती निर्णय खरा ठरवला. 1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून काम करायला सुरुवात केली. तसंच कामगार विश्व, इ-मर्क या कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं आहे. 1980 मध्ये त्यांनी खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना केली. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. प्रदीप भिडे 1974 पासून ते दूरदर्शनमध्ये दाखल झाले.
पत्नीला सरकारी नौकरी लागली म्हणून पतीने तिचा हात कापला
त्या नंतर मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने रेकॉर्डिंग स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती डॉक्युमेंटरी आणि शॉटफिल्म यावर आपला आवाज ठसविला.
भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती डॉक्युमेंटरी आणि शॉटफिल्म यांना आवाज दिला असून दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन केलं आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे संख्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाच्या मुलाखती देखील घेतल्या. त्यांच्या कारकीर्तीत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या त्यातील एक म्हणजे 21 मे 1991 ला श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींची हत्या झाली. तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांना असशील तसा त्वरित निघून ये म्हणून सांगितलं. तेव्हा ही बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली होती. मुंबईत स्मशानशांतता पसरली होती. तेव्हा ते पोलिसांच्या जीपने केंद्रात आले आणि कोणताही अभिनिवेश न आणता त्यांनी ही बातमी दिली होती.