छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ‘या’ तारखेला
औरंगाबाद -औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मागील आठ दिवस झाले मात्र प्रशासन अनावरण कधी होऊल याची तारीख स्पष्ट करत नव्हतं यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटत होता. त्यावर आज प्रशासनाने अनावरण कधी आणि कुणाच्या हस्ते होणार याच स्पष्टीकरण दिल आहे.
देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री कार्यालयाने कळविले आहे.[lock][/lock]