महाराष्ट्र

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहू तसेच आळंदी येथील मंदिरे राहणार संक्रांतीला बंद

Share Now

पुणे : सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएन्ट मुळे जागतिक पातळीवर जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालय देखील बंद राहणार आहे. तसेच १४ जानेवारी रोजी येणाऱ्या मकर संक्राती बदल देखील राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी दर्शन देखील बंद राहणार आहे.

देहू येथे कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन हे निर्बंध लावण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्र भरातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू तसेच आळंदीत दाखल होतात. याचा विचार करून देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर १४ जानेवारी रोजी सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहील.

तसेच आळंदी येथे देखील भाविक संत ज्ञानेश्वर माऊलींना ओवसा वाहायला दाखल होतात. वाढत्या ओमायक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने देखील माऊलींची संजीवनी समाधी मंदिर १३ ते १५ जानेवारी पर्यंत बंद राहिली. अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *