‘त्या’ तरुणीच्या हत्येतील संशयित तरुणाची आत्महत्या ; मांडकी शिवारात घेतला गळफास
नारेगावातील राजेंद्रनगर भागात १८ मे बुधवार रोजी सायंकाळी झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य संशयित तिच्या मित्राने मांडकी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली . हि घटना शुक्रवारी २० मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शंकर विष्णू हगवणे (२४, मूळ रा. येवता बंदी, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) असे मृताचे नाव आहे . ब्रिजवाडी येथील रेणुका देवीदास ढेपे (१९) या तरुणीचा नारेगावातील राजेंद्रनगरात शंकरच्या खोलीत निर्घृण खून झाल्याचे समोर आले. शंकर आणि रेणुका हे चांगले मित्र होते. त्या दिवशी दुपारपासून दोघेही खोलीमध्ये एकत्र होते.
रेणुकाचा खून झाल्यापासून शंकर गायब होता. यामुळे पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून शंकरचा शोध सुरू केला होता. घटनेपासून त्याचा मोबाइलही बंद होता. पोलिसांचे पथक त्याच्या शोधण्यासाठी गावी गेले होते. मात्र, तेथे तो सापडला नव्हता. शंकर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याचा चुलतभाऊही नारेगावमध्ये राहतो . त्याहीची चौकशी करण्यात आली मात्र . परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही .
शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मांडकी शिवारातील बन्सीधर झिंजुर्डे यांना त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला .
हेही वाचा :- भाजपच्या माजी आमदार पती पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
ही बाब बन्सीधर यांनी चिकलठाणा पोलिसांना कळविली. माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली तेव्हा हे प्रेत शंकर हगवणेचे असल्याचे समजले. ही माहिती त्याचा चुलतभाऊ प्रदीप यांना कळविली. प्रदीपही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने ते प्रेत शंकरचेच असल्याचे पोलिसांना सांगितले.
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घाटीत हलविले. चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार रवींद्र साळवे या घटनेचा तपास करीत आहेत.
हे ही वाचा (Read This) उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे पेय: बनवा लिंबू आणि पुदिन्याचे हे थंड पेय, कसे बनवायचे ते जाणून घ्या