क्षुल्लक कारणांवरून मुलाने केला बापाचा खून
दारू पिण्याच्या कारणावरून मुलानेच आई, बहीण आणि भावासमोर वडिलांच्या डोक्यात लोखंडी घणाने प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केला. यावेळी वडिलांना वाचविण्यासाठी धावलेल्या मोठ्या भावालाही घणाने मारहाण करून जखमी केल्याची घटना औरंगाबाद शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चिकलठाणा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
कडुबा भावराव घुगे (वय ६५) राहणार चिंचोली असे मृताचे नाव आहे. नानासाहेब घुगे (वय २५) राहणार चिंचोली असे आरोपी मुलाचे नाव असून, चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की कडुबा यांना मच्छिंद्र आणि नानासाहेब दोन मुले आणि तीन विवाहित मुली आहेत. शुक्रवारी सायंकाळी घरी आल्यानंतर दारू पिऊन आल्याचे नानासाहेब यांच्या लक्षात आले याच कारणाने वडिलांसोबत त्याचा वाद सुरू झाला.
यानंतर नानासाहेब घुगे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमरास कडूबा घरासमोरील बाजेवर तर आई बहीण आणि मोठा भाऊ अगणात बसलेले होते. तेव्हा घरी आलेल्या नानाने वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत. ड्रमवर ठेवलेला लोखंडी घण त्याने वडिलांच्या डोक्यात घातला.
डोक्या, कानातून रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध पडले. आई, भाऊ, बहीण आणि भाचीने नानाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने भाऊ मच्छींद्रवर घणाने हल्ला केला.
नानासाहेब घुगे याने सर्वांना शिवीगाळ करीत तो निघून गेला. कुटुंबीयांनी कडूबा यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कडूबांची पत्नी संगीताबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस नानाविरोधात नोंदविण्यात आला.