‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला मिळेल पण ‘या’ अटीवर, कायदेतज्ज्ञांचे मत
सध्या जे महाराष्ट्रात चालू आहे महाराष्ट्रात याला आम्ही सायकॉलॉजिकल वॉर म्हणतो. काही लोकं बाहेर गेलेत, यातले किती लोकं खरंच गेलेत, किती पाठवले गेलेत याचा आकडा नेमका स्पष्ट नाही. परंतु दोन तृतीयांश लोकं जर का बाहेर पडले तर ते डिसक्वालिफाय होत नाहीत. इथे जो पक्ष आहे तोच खरा शिवसेना पक्ष आहे. आसाम मध्ये जे आमदार गेले आहेत. बंडखोर आमदारांना हा पक्ष आमचा आहे असा दावा करता येत नाही. याने मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होत नाही. असं कायदेततज्ञ सांगतात.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांश बहुमत सिद्ध केलं तर त्यांना शिवसेनेचे चिन्ह मिळू शकतं. मात्र, ही प्रकिया एक दोन तासात पूर्ण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर पूर्ण सरकार बरखास्त होईल. आता जे सुरु आहे ते सायकॉलॉजीकल युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्र्यांकडे अजूनही सर्व अधिकार आहेत असंही ते म्हणालेत. यात निवडणूक आयोगाचे काम हे अंपायरसारखं असल्याचं सुद्धा कायदेततज्ञ आवर्जून सांगितात
‘धनुष्यबानावर’ शिंदे गटाचा दावा ?
शिवसेनेकडे किती आमदार?
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड केले होते तेव्हा शिवसेनेकडे 22 आमदार शिल्लक होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली असून, आता शिवसेनेकडे केवळ 15 च आमदार आहेत. त्यामध्ये,
राजन साळवी (राजापूर)
सुनील प्रभू (मालाड)
प्रकाश फातर्पेकर (चेंबूर)
सुनील राऊत ( विक्रोळी)
वैभव नाईक ( कुडाळ-मालवण)
आदित्य ठाकरे ( वरळी)
रमेश कोरगावकर (भांडुप)
कैलास पाटील (पाचोरा)
नितीन देशमुख ( बाळापूर)
अजय चौधरी (शिवडी)
राहुल पाटील (परभणी)
संतोष बांगर ( हिंगोली)
भास्कर जाधव (गुहागर)
रवींद्र वायकर ( जोगेश्वरी)
संजय पोतनीस ( कलिना) यांचा समावेश आहे.
शिवसेनेत बंडखोरी सुरूच
दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करून सुद्धा शिवसेनेत बंडखोरी सुरूच आहे. आता शिवसेनेकडे केवळ 15 आमदार शिल्लक आहेत. बाकीचे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. सुरुवातीला आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत शिवसेनेला सोडून, एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील यांचा देखील समावेश आहे.