कोरोनाचा धोका वाढला ; या देशात कोरोनाचा नवा स्ट्रेन

भारतात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहेत यामुळे निर्बंध देखील शिथिल करण्यात आले. परंतु पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे.
इस्रायलमध्ये कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले. ओमायक्रॉन आणि BA.2 व्हेरिएंटचे विषाणू त्यांच्यामध्ये आढळून आले आहेत. अद्याप जगात कुठेही अशा प्रकारचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले नसल्याचं इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केले आहे.

इस्रायल आरोग्य मंत्रालयाने याबद्दल अधिक माहिती दिली की, परिस्थिती चिंताजनक नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांचा आरटी पीसीआर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. या दोघांच्या शरीरात नवा स्ट्रेन आढळून आला.

या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या दोघांना ताप, डोकेदुखी आणि मांसपेशीचे विकार अशी लक्षणं आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. लक्षणं सौम्य स्वरुपाची असल्यानं रुग्णांना कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधांची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्यानं धोका असल्याची शक्यता इस्रायलच्या पॅनडेमिक रिस्पॉन्सचे चीफ सलमान जरका यांनी सांगितलं. परिस्थिती चिंताजनक नसल्याचं जरका म्हणाले. इस्रायलची लोकसंख्या ९२ लाख इतकी आहे. यापैकी ४० लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचे तीन-तीन डोस देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *