CDS जनरल बिपिन रावत यांच्या अपघाताचं कारण समोर एअरफोर्स चौकशी समितीने सादर केला अहवाल
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ लष्करी अधिकाऱ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. घडलेल्या दुर्घटनेनंतर ही दुर्घटना का घडली असेल यावर असा प्रश्न सर्वांना पडला होता. उच्चस्थरिय तपासही झाला. या तपासातून या दुर्घटनेचं कारण समोर आले आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी एअरफोर्सच्या चौकशी समितीचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. एअरफोर्सच्या चौकशी समितीनुसार, हॅलिकॉप्टरमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. अथवा कट, किंवा दुर्लक्ष हे अपघाताचं कारण नाही. अचानक पणे बदललेल्या क्लायमेटमुळे हेलिकॉप्टर चा मार्ग भटकला अन् त्यामुळेच हा अपघात झाला आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या दुर्घटनेचा एअरफोर्सच्या चौकशी समितीने बारकाईने अभ्यास केला. यामध्ये फ्लाइट डाटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रिकॉर्डरचे विश्लेषण पूर्ण झालं. याप्रकरणाची कोर्ट ऑफ इंक्वॉयरीमध्ये रिकॉर्डिंगचे विश्लेषण करण्यात आले.
https://twitter.com/ANI/status/1481982337114308609?t=GucHIHgSgSB5Cj04D9ZxQA&s=19