महाराष्ट्र

राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध झालेला नाही ; मुंबई सत्र न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

Share Now

हनुमान चालीसा वादातून अटक करण्यात आलेल्या राणा दाम्पत्याला अखेर बुधवारी ११ दिवसांनी सत्र न्यायालयातून जामीन मिळाला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा आरोप सिद्ध झालेला नाही. त्याचवेळी पोलिसांच्या नोटीसनंतर राणा दाम्पत्य घराबाहेर पडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला फटकारलं आहे

हेही वाचा :- मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा ‘मूलभूत अधिकार’ नाही, वादाच्या भोवऱ्यात अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल

नवनीत राणा गेल्या ११ दिवसांपासून भायखळा कारागृहात बंद असून बुधवारी ४ मे रोजी १२ व्या दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची मुदतपूर्व सुटका करण्यात आली आहे. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना अटींसह जामीन मिळाला आहे. राणा दाम्पत्याची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टातून सुटका करण्यात आली आहे

अटींसह जामीन मंजूर
जामीन मंजूर करताना न्यायालयाने दाम्पत्यासाठी अनेक अटीही घातल्या आहेत. आदेशानुसार राणा दाम्पत्य मीडियाशी बोलू शकत नाही. पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही. या जोडप्याने पुन्हा असा कोणताही गुन्हा करणार नाही, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय पोलीस त्यांना २४ तास अगोदर नोटीस देतील, त्यानंतर त्यांना हजेरी देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागेल. त्यांनी पुन्हा असा गुन्हा केल्यास जामीन रद्द होईल.

हे ही वाचा (Read This) सरकारी नोकरी: महाराष्ट्र विद्युत विभागात भरती, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *