जून-जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता?, महापालिका ‘हाय अलर्ट’ वर
नुकतीच कोरोनाची तिसरी लाट पूर्णतः ओसरली असून, लसीकरण देखील झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रात निर्बंध देखील हटवण्यात आले. मात्र दिल्लीमध्ये कोरोना वेगाने वाढत असल्याने, महाराष्ट्र राज्यातील सर्वच महापालिकांना हाय अलर्टवर आहे. औरंगाबाद महापालिकेने देखील हाय अलर्ट मोड एक्टिव्ह केले. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मांडलेचा यांनी दुसरी लास घेण्यासाठी जनतेला आवाहन केले आहेत.
हेही वाचा : आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीच्या आत्महत्येचे गूढ उकलणार ?
तसेच जून-जुलै महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञाकडून व्यक्त असून, दिल्ली कोरोना संख्या वाढीमुळे देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. या सर्व बाबद डॉ मांडलेचा यांनी सांगितले की, ” सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लसीकरणावर चर्चा झाली, दुसरा डॉस घेण्यास टाळणाऱ्याना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात मनपाने सुरुवात केली आहे. तसेच पवित्र रमजान आणि वाढते ऊन लक्षात घेता संद्याकाळी लसीकरण केंद्र सुरु ठेवले आहे. चौथ्या लाटेपासून बचावसाठी लसीकरण महत्वाचं आहे” असे डॉ मंडालेचा यांनी सांगितले.
हे वाचा : वाढत्या तापमानामुळे पशुपालक अडचणीत, दूध उत्पन्नात घट
दरम्यान, सुरुवातीला लसीकरण अतिशय वेगाने सुरु होते, नागरिकांनी देखील लसीकरणासाठी गर्दी केली, काही नागरिकांनी दुसऱ्या परिसरात जाऊन लसीकरण करून घेतले. मात्र आता लसीकरण केंद्रावर जाण्यास आणि लसीकरण करून घेयनास नागरिक टाळाटाळ करत आहे,