क्राईम बिट

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून ; मृतदेह प्रेयसीच्या अंगणात

Share Now

प्रेयसीला भेटीला गेलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खिरी जिल्ह्यात सोमवारी रात्री समोर आला. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला तिच्या वडिलांनी रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला व त्याचा मृतदेह घराच्या अंगणात बांधलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये टाकून दिला.

हाती आलेल्या माहितीनुसार, अजमत अली यांचा १८ वर्षांचा मुलगा नसीम याचं दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या १७ वर्षीय परधर्मीय तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. नसीम आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी तिच्या घरी पोहोचला. याची कुणकुण तिच्या बापाला लागली. नसीम आणि मुलीला त्याने रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्याने मुलाला झापलं, मात्र तिच्या प्रियकराचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचे मृतदेह गोणीत भरून अंगणातील सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले.

पोलिसांनी नसीमच्या प्रेयसीच्या घरी धाव घेतली. तिच्या वडिलांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. नसीमची गळा दाबून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरुन घराच्या अंगणात बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी पंपाद्वारे सेप्टिक टँकमधील पाणी उपसलं आणि गोणीत भरलेला नसीमचा मृतदेह बाहेर काढला. तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *