अल्पवयीन मुलाने केले शिक्षिकेचे बाथरूममधील चित्रीकरण, पुण्यातील धक्कादायक घटना
१६ वर्ष्याच्या मुलाने शिक्षिकेचे बाथरूममध्ये मोबाईल ठेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. गेल्या ५ वर्षांपासून पीडित शिक्षिका त्या मुलाची इंग्रजीची शिकवणी घेत होती. तो मुलगा ११ वर्षा पासून त्याच्या आई वडिलाने त्याचे प्रायव्हेट ट्युशन लावून दिले होते. हि घटना पुण्यातील कोथरूड येथे घडली.
गेल्या ५-६ वर्षांपासून शिक्षिका त्या मुलाच्या घरी शिकवायला येत होती. काल ही शिक्षिका त्याच्या घरातील बाथरुमचा वापर करण्यासाठी गेली असता आतमधील साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकताना या शिक्षिकेला दिसले. साबणाचे खोके बाजूला केले असता त्या पाठीमागे मोबाईल लपवला असल्याचे आणि त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याचे या शिक्षिकेला आढळून आले. तिने तो मोबाईल ताब्यात घेऊन तपासला असता त्यात तिचे आणखीन काही व्हिडिओ त्यात तिला वाढले. त्याचबरोबर इतर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ देखील त्या मोबाईलमध्ये आढळून आले.
त्यानंतर या महिला शिक्षिकेने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी आय टी एक्ट नुसार या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंद केलाय. या मुलाला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहेत आहे.