लग्ना आधीच्या प्रियकरासोबत विहिरीत उडी घेऊन विवाहितेने केली आत्महत्या

अनैतिक प्रेमसंबंधातून विवाहितेने प्रियकरासोबत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील भूना मासाला परिसर भागात घडली. दिनांक १६ बुधवार रोजी ही घटना दुपारी एक वाजता उघडकीस आली, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मंगला राजेंद्र उमाटे वय (४०) असून म्हसाळा वस्ती येथील रहिवासी आहे. तर महेश कमलाकर बारई (४०) रा वरुड अशी मृतांची नावे आहेत.

मंगला आणि महेश या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा यापूर्वी होती मंगला उमाटे या महिलेचे वणवाला परिसरात शेत असून मंगला बचतगटाचे देखील काम करायची. १५ मार्च पासून मंगला बेपत्ता होती. यामुळे तिच्या पतीने सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मात्र बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास मंगला आणि महेशचा मृतदेह मंगलाच्या शेतातील विहिरीत आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *