प्रेमी युगलाने हॉटेलमध्ये संपवले जीवन, विवाहास होता कुटुंबियांकडून विरोध
प्रेमाची सुरवात कशी झाली यापेक्षा प्रेमाचा अंत चागला व्हावा, अशी प्रत्येक प्रियकराची इच्छा असते. मात्र औरंगाबादच्या एका प्रेमी युगुलाने एका हॉटेलमध्ये स्वतःला संपवून आपल्या प्रेमाचा दुखद शेवट केला. शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये 21 वर्षीय प्रियकराने गळफास घेऊन तर प्रीयेसीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर राजेश बावणे (वय 21 वर्षे, संभाजी कॉलनी) आणि सपना अंकुश खंदारे (वय 19 वर्षे, प्लॉट नंबर 34, लक्ष्मीनगर मुकंदवाडी) असे या जोडप्याचे नाव आहे.
कापसाच्या भावात घसरण, मात्र कापडाची महागाई जोरात, समजून घ्या येणाऱ्या काळात कापसाचे दर कसे असतील
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल ग्रेट पंजाबमधील खोली क्रमांक 205 सागरने 29 जुलैला बुक केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 30 जुलैला सपना त्या खोलीत दाखल झाली. दरम्यान या दोघांचे प्रेमसंबधाबाबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना माहित नसल्याने सपनाच्या घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी मुकंदवाडी पोलीस ठाण्यात केली होती. तर सागर अधूनमधून बाहेर गावी जात असल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना कळवळ नाही.
महागाई भत्ता वाढणार ? वाढत्या महागाईवर सरकार घेऊ शकते मोठा निर्णय
दरवाज्यातून दुर्गंधी यायला लागली आणि…
30 जुलैला सपना हॉटेलमध्ये आल्यावर हॉटेल चालकाने दोघांचे आधार कार्ड घेऊन नोंद केली. त्यांनतर रूममध्ये गेल्यावर 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दोघांनी कोणतेही ऑर्डर केली नाही. मात्र 2 तारखेला हॉटेलचा कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी गेला असता, सागरच्या रूममधून त्याला दुर्गंधी येऊ लागली. त्याला संशय आल्याने याची माहिती त्याने हॉटेल व्यव्स्थापकाला दिली.
पोलिसांनी दरवाजा उघडताच…
हॉटेल व्यव्स्थापकाने याची माहिती तत्काळ वेदांतनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस काही वेळेतच हॉटेलमध्ये दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने व्हिडिओ शुटींग करत पोलिसांनी दरवाजा तोडला. यावेळी सागर गळफास घेतलेल्या तर सपना बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनत दोघांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात उत्तरतपासणीसाठी पाठवले. मात्र दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.