क्राईम बिट

प्रेयसीला धोका देऊन प्रियकर करत होता लग्न ; मात्र प्रेयसीने केलं असं कि लग्नच थांबलं

Share Now

नागपूर :- प्रेयसीला धोका देऊन अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या प्रियकराचं लग्न प्रेयसीच्या सतर्कतेमुळे थांबलं . या लग्नात बालसंरक्षण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी पोहोचल्याने हे लग्न थांबविण्यात आले आहे .

पारडी येथील २४ वर्षीय रितेश (नाव बदललेले ) चे २३ वर्षीय हिना (नाव बदललेले ) हिच्याशी प्रेमसंबंध होते. काही महिन्यापूर्वी नीलेश व नेहाचा ब्रेकअप झाला होता. मात्र नीलेशची पारडी येथील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक वाढल्याचे नेहाला कळले होते.

हेही वाचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात इंडियन बार असोसिएशनतर्फे याचिका दाखल

नीलेशचे त्या अल्पवयीन मुलीशी २७ एप्रिलला लग्नही ठरले होते. नीलेशच्या स्वभावानुसार तो त्या अल्पवयीन मुलीलाही धोका देईल, असे नेहाला वाटले. तिने पोलीस स्टेशन, उपायुक्त व पोलीस आयुक्त कार्यालयाला लेखी तक्रार केली. त्यामुळे हे प्रकरण बालसंरक्षण विभागाकडे पोहोचले.

बाल संरक्षण विभागाचे पथक व पोलीस लग्नस्थळी पोहोचले. तिथे मुलीच्या जन्मदाखल्याची तपासणी केली असता, ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा विवाह थांबविण्यात आला. मुलीच्या पालकांना १८ वर्षांच्या आत लग्न केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली.

तक्रारीबाबत ठेवण्यात आली गुप्तता सूत्रांच्या माहितीनुसार नीलेश गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेहाच्या तक्रारीबाबत बाल संरक्षण विभागाकडून गुप्तता बाळगण्यात आली. बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्याकडून विभागाला सूचना मिळाली होती. त्यानुसार घटनास्थळावर पोहोचून चाइल्ड प्रोटेक्शन अॅक्ट अन्वये कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा (Read This)  पशुसंवर्धन: उन्हाळ्यात प्राण्याला संसर्ग झाला आहे का ? ते असे तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *