वडिलांची शेवटची इच्छा केली मुलींनी पूर्ण, वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा
औरंगाबाद : वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रथेला फाटा आला. औरंगाबाद शहरात बजाजनगर हे औधोगिक वसाहत मानली जाते. अशा ठिकाणी पुरुषोत्तम खंडेलवाल (७२, रा बजाज नगर) हे गेल्या २५ वर्षांपूर्वी ५ मुली आणि बायको घेऊन नाशिक येथून औरंगाबादला आले. मुलगा नसल्याचे दुःखन बाळगता मेहनतीने कापड व्यवसाय सुरु केला. सायकलवर कापड विकायला जाणे, घर चालवणे, मुलींचे शिक्षण करणे हा त्यांचा दिनक्रम बनला. घरत मुलाची कमी भासू दिली नाही आणि सर्व मुलीना उच्च शिक्षण दिले ४ मुलीचे लग्न करून दिले. एक मुलगी छत्तीसगड तर एक भोपाळ आणि दोन शहरात दिल्या.
हाती आलेल्या माहिती नुसार, काळ मुलगी राणीला मला एक कप दूध दे तो पर्यंत मी फ्रेश होतो असे सांगून ते बाथरूम मध्ये गेले. आणि खुप वेळ झाला का वडील बाहेर येत नाही हे पाहण्यासाठी राणीने बाथरूमचे दार वाजवले तरी दार उघडले नाही. शेवटी शेजारच्यांच्या मदतीने दार तोडून पाहता तिथे वडील मृत झाल्याचे राणीला कळले. तीने आपल्या चारही बहिणीला फोन वर वडील गेल्याचे सांगितले.
दरम्यान, छत्तिसगड आणि भोपाळ वरून बहिणी आल्या नंतर अंत्य संस्काराची तय्यारी सुरु झाली पण प्रश्न हा होता आता खांदा देणार कोण? त्यांच्या मुलींनी खंड दिला आणि नातवाने अग्निडावं देऊन वडिलांना शेवटचा नमस्कार केला. हे पाहून सर्व भावुक झाले आणि या मुलींनी समाज समोर नवीन आदर्श उभा केला.