औरंगाबाद जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्णाची संख्या चिंताजनक
औरंगाबाद: कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे, मागील आठ दिवसात वाढलेली आकडेवारी मात्र जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे. वाढणारी रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी शाळा , कॉलेज देखील बंद करण्यात आले असून त्याच बरोबर रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांचा बेफिकिरपणा या वाढणाऱ्या आकडेवारीचे कारण असू शकतो.
काल दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८०० च्या पुढे गेली आहे, केवळ औरंगाबाद शहरात ७०१ रुग्ण बाधित झाले असून ग्रामीण भागातील १५६ कोरोना बाधित रुग्णाची नोंद आहे. काल दिवसभरात २४४ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यात ग्रामीण भागातील ४४ तर शहरातील २०० कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे.
वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या बघता आरोग्य विभाग आणि प्रशासन उपाय योजना करत आहे. मात्र काही नागरिकांच्या निष्काळजीपणा या वाढत्या रुग्णसंख्येला कारण ठरू शकतो. यासाठी शहरवासीयांनो नियमाचे पालन करा.