newsमहाराष्ट्रराजकारण

सरकारच ठरलंय , दुकानाच्या पाट्या आता मराठीतच

Share Now

माझी भाषा माझा अभिमान आज ठाकरे सरकारचा याबाबत मोठा आहे, एकीकडे मराठी वाचवा अशी मोहीम सुरु आहे, राज्यातीळ बऱ्याच पाट्या या मराठीत नसायच्या यावर राज्य सरकारने मराठीत पाटी असावी अशा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती , आता सर्वच पाट्या मराठी मध्ये देखील असाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असतात . मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आजच्या बैठकीत झाली आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात यासाठी ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास मिळत होत्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणी होत होती. आज मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *