अखेर अटकेत नवले पुलावर 48 वाहनांना धडक देणाऱ्या ट्रकचा हाच तो चालक!
रविवारी झालेल्या अपघातानंतर कुठे फरार होता चालक? कुणी आणि कसं पकडलं चालकाला? वाचा
नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करु : सुप्रिया सुळे
पुणे : रविवारी नवले पुलावर 48 वाहनांचा विचित्र अपघात (Pune Accident) झाला होता. या अपघातात ट्रक चालकाने तब्बल 48 वाहनांना जबर धडक दिली होती. यामुळे अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान झालं होतं. अपघात इतका भीषण होता की 10 जण जखमी झाले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर ज्या ट्रकमुळे (Truck Accident) हा अपघात घडला, त्या ट्रकचा चालक फरार होता. या चालकाला अखेर अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाचं नाव मनिराम यादव (Maniram Yadav) असं आहे.
औरंगाबाद हादरले ! प्रेमप्रकरणातून मुलाने मुलीला कॉलेज मध्येच पेटवले, मुलगाही भाजला
चाकण येथील नानेकरवाडी येथून आरोपी चालकाला ताब्यात घेतण्यात आलं आहे. नवले पूल येथे अपघातात फरार झालेला चालकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. मनिराम यादव या आरोपीची आता पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
खुनाची मालिका तुटेना ! “साहेब, रोजची कटकट थांबवली” म्हणत पत्नीच्या खुनाची पतीने स्वतःच दिली कबुली
रविवारी या चालकाने गाडी उतारावर न्यूट्रल ठेवून चालवली होती. त्यावेळी त्याच्या ट्रकचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे या ट्रकने तब्बल 48 वाहनांना जबर धडक दिली. या धडकेत सुमारे 40 ते 50 जण जखमी झालेत. आता ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून पुढील कारवाई सुरु आहे.
रेल्वे नोकरी: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 10वी पाससाठी 2500 जागा, येथे अर्ज करा
रविवारी झालेल्या नवले पुलावरील अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. हा मार्गावरची वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्यात यश आलं होतं.
पोस्ट ऑफिसच्या या 4 योजना तुम्हाला बनवतील श्रीमंत, 12,500 ची रक्कम होईल 1.03 कोटी रुपये
48 वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात 10 ते 12 गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला होता. यामुळे रस्त्यावर एकच खळबळ उडालेली. पुलावरील तीव्र उतारामुळे हा अपघात झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. पण नंतर ब्रेक निकामी झाल्यानं चालकानं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचं समोर आलं.
धक्कादायक बाब म्हणजे यानंतर चालू ट्रक सोडून चालकाने पळ काढल्यानं या अपघाताची तीव्रता आणखीनच वाढली होती. आता या ट्रक चालकावर पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.