संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली
कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा बसावा यासाठी देशात निर्बंध लावण्यात येत आहेत, त्यात संसदेचं अधिवेशन काही दिवसावर आलेलं आहेत. मागील काही दिवसात संसदेतील बरेच कर्मचारी कोरोना बाधित झाले यामुळे अधिवेशन कधी आणि कश्या प्रकारे होईल असा प्रश्न पडला होता. मात्र यावेळी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात विभागणी करून घेण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या संदर्भात २६ किंवा २७ जानेवारी रोजी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्ष भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा एक भाग घेण्याची शिफारस केली आहे; १४ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान भाग दुसरा भागात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
CCPA recommends part one of Parliament's Budget Session from Jan 31 to Feb 11; part two from March 14 to April 8: Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2022