सहा महिन्या पूर्वी रचले होते षडयंत्र? , सिल्वर ओक हल्ला प्रकरणी धक्कादायक माहिती समोर
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एक मोठा माहिती समोर आली असून. अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या सहा महिन्यांपासून बैठक सुरू असल्याच्या माहितीवरुन पोलीस अधिक तपास करीत आहे. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या?. यामध्ये बैठकांना नियमित कोण उपस्थिती राहत होते ? याचा पोलीस शोध घेत आहेत. यामुळे सदावर्तेंच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आलं होत. त्यानंतर त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला होता. यानंतर आता कोल्हापुरामध्ये कलम १५३ A नुसार गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बैठकीत येणाऱ्यांची सीसीटीव्हीच्या मदतीने माहिती घेतली जात आहे.
हेही वाचा : राज्यातील ‘या’ शहरात येणारी लाखोंची बनावट दारू जप्त
दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सदावर्ते यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दिली. त्यानंतर आता याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
हेही वाचा :- धक्कादायक | खिचडीत मीठ जास्त झाले म्हणून पत्नीचा खून
मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा आरोप केला. तसंच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारं सदावर्तेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी दिलीप पाटील यांनी केली होती. दरम्यान, आता दिलीप पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरातही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.