बस चालकाला आला फिट, एका महिलेने दाखवलेल्या धाडसाने सर्व महिला सुखरूप घरी परतल्या
शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली याठिकाणी फिरायला गेलेल्या एका महिला ग्रुपसोबत एक अनपेक्षित घटना घडली आहे. या महिला ज्या बसने पर्यटनासाठी गेल्या होत्या, त्या बसच्या चालकाला अचानक फिट आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर या बुसमधील सर्वच महिला भयभीत झालेल्या होत्या.
या घाबरलेल्या महिलांना वाघोली येथील योगिता सातव यांनी धीर दिला. योगिता सातव यांनी बसचं स्टेरिंग स्वतःच्या हाती घेऊन सर्व महिलांना सुखरूप घरी तर घेवून आल्या त्याचबरोबर फिट आलेल्या चालकाला वेळीच उपचार देखील मिळाला आहे. योगिता सातव यांचा बस चालवताना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत तर आहेच, त्यासोबत त्यांनी दाखवलेल्या धाडसच कौतुक देखील होत आहे.
आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विटवर हा व्हिडिओ पोस्ट केला असून योगिता सातव यानी दाखवलेल्या धाडसाच कौतुक केलं आहे.
गाडी चालवताना चालकाला फिट आल्याने वाघोलीतील योगिता सातव या भगिनीने स्वतः १० कि.मी. गाडी चालवून चालकाला हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याचे प्राण वाचवलेच पण गाडीतील इतर महिलांनाही सुखरुप पोहोचवलं. अचानक उद्भवलेल्या संकटात कसं प्रसंगावधान दाखवावं याचं उदाहरणच त्यांनी दाखवून दिलं. pic.twitter.com/H7ciJoxlUj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2022