राजकारण

ठाकरे – शिंदे गट एकमेकांनामध्ये भिडले ; कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Share Now

राज्यातील राजकारण राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलंच तापत चाललं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये वैर वाढत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले , ठाण्यात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर ठाकरे गट श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय – जितेंद्र आव्हाड

ठाण्याच्या किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.

ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले, संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेत उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती, शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले असता शिंदे गटाने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे .

रविवारी, ३१ नोव्हेबंर २०२२ रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. याच कार्यक्रमात आव्हाडांविरोधात तक्रार करणारी महिलाही उपस्थित होती. याच कार्यक्रमात विनयभंग झाल्याचा दावा तक्रारदार महिलेनं केला आहे. 40 वर्षीय तक्रारदार महिलेनं या कार्यक्रमात आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीनं शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितलं. दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्यात महिलेनं जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना पुन्हा या प्रकरणाची यात भर पडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *