धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; वाहनाने मेंढ्याचा कळप चिरडला

धुळे-सोलापूर महामार्गावर मोठा अपघात झाला. भरधाव जाणाऱ्या वाहनाने एका मेंढ्यांच्या कळपालाच चिरडलं असून यात जवळपास ४५ ते ५० मेंढ्यांना चिरडून हे वाहन पुढे निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे . मेंढ्याना घेऊन निघालेल्या मेंढपाळांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या
वाहनाने त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं आणि गरीब जनावरांना चिरडत हे वाहन पुढे निघून गेलं. एवढा जीव लावलेलं, महागातलं जनावर असं डोळ्यादेखत चिरडलं गेल्यानं मेंढपाळाचा जीव कासावीस झाला.आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला धुळे सोलापूर महामार्गावर घडला .

औरंगाबादनजीक धुळे सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेची आपबिती सांगताना मेंढपाळ म्हणाले, ‘ मेंढ्या रस्त्यावरून येत असताना एक इंडिका भरधाव वेगाने येत होती. आम्ही सर्वांनी त्याला खूप वेळा हातवारे केले. पण ती थांबली नाही. पुढे गेल्यावर चुक झाली असे दाखवत त्याने हातवारे केले. मेंढ्यांना चिरडत निघालेल्या या इंडिकाखाली आमचं माणूसही चिरडलं जाणार होतं. बरं झालं जितराब गेलं अन् जीव वाचला…’ या अपघातात 10 ते 15 मेंढ्यांचा जागेवरच चिखल झाला होता. तसेच अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या अपघाताने मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *