राजकारण

मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत तणाव, एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत

Share Now

मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत तणाव, एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत
एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेणार, मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत दावे-प्रतिदावे
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याच्या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतल्याची माहिती आहे. ठाण्यात दुपारी तीन वाजता होणारी या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून उपमुख्यमंत्रिपद आणि केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर नाकारत महायुतीला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एकनाथ है तो सेफ है’ शिंदे गटाच्या महिला नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

महायुतीने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले असले तरी, मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलेच दावे-प्रतिदावे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना महायुतीमधील १७८ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून शिंदे यांच्या दबावास तोंड देत भाजपने फडणवीस यांचेच नाव पुढे केले आहे.

मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेली गडबड, तसेच एकनाथ शिंदे यांच्या भूमिका यावर मोठी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, महायुतीमधून बाहेर पडणार का, किंवा अन्य कुणाचे नाव समोर करणार यावर तपशील मिळण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या राजकीय दृष्टीने ही पत्रकार परिषद खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *