चंद्रपूर: मतदान केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव, पोलिसांनी राखली शांतता
चिमूर शहरात भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांचा हस्तक्षेप करून शांतता
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज मतदानाच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. जिल्हा परिषद कन्या शाळा येथील मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी आणि बाचाबाची झाली, ज्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
अनिल देशमुख हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट! रुग्णालयातून डिस्चार्ज घेताच दिला हल्लेखोरांना इशारा
सकाळी ९ वाजताच्या सुमारास भाजपचे आमदार बंटी भांगडिया आणि माजी आमदार मितेश भांगडिया कार्यकर्त्यांसह केंद्रावर पोहोचले. त्याच वेळी काँग्रेसचे माजी सदस्य गजानन बुटके देखील काँग्रेस स्टॉलसह उपस्थित होते. बुटके यांच्या सोबत बॉऊन्सर असल्यामुळे तणाव निर्माण झाला. आमदार भांगडिया यांनी बॉऊन्सरला केंद्राच्या परिसरातून बाहेर जायला सांगितल्याने परिस्थिती अधिकच तापली.
नोटबंदी करता आणि…; सुप्रिया सुळेंकडून चौकशीची मागणी
तणाव वाढल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तो शांत केला. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरू असताना पोलिसांनी आपला ताबा राखून वाद थांबवला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले असून, पोलिसांच्या कारवाईमुळे तणाव न वाढता शांतता प्रस्थापित करण्यात आली.