३२ वर्षापासुन राजकारणात तरी मुंबईत बेघर, चंद्रकांत खैरेंचे वक्तव्य
औरंगाबाद : सध्या आमदारांना मुबंईत घर देण्यावरून राजकीय वादंग पेटला आहे, अनेक आमदार या निर्णयाच्या विरोधात आहे तर काही या निर्णयाला समर्थन देत आहे. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केला आहे. यातच शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणजे “३२ वर्ष राजकारणात असूनही मला मुंबईत घर घेता आले नाही”, या विधानावरून अनेकांच्या भुवया उनाचावल्याचे पाहायला माहित आहे.
पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले, ” ‘मुंबईत अद्याप घर न मिळाल्याची खंत मला अजूनही सतावतेय. आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहिले असता 32 वर्षे उलटले तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत,’ असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.