तालिबानमुळे अफगाणातील ११० भारतीय मायदेशी
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर हजारो नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तानची भूमी सोडत आहेत. यात भारतीय समुदायातील नागरिकांचाही प्रामुख्याने समावेश आहे. एका विशेष चार्टर विमानाने आज काबूलहून ११० नागरिकांना भारतात आणण्यात आले. यात हिंदू, शिख आणि काही अफगाण नागरिकांचा देखील समावेश आहे. इंडिया वर्ल्ड फोरमने दिलेल्या निवेदनानुसार, अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय नागरिक, हिंदू, शिख समुदायातील आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना भारतात आणले. अफगाणिस्तानच्या गुरुद्वारातून तीन श्री गुरू ग्रंथ साहिब आणि पाचव्या शताब्दीतील प्राचीन असमाई मंदिर, काबूलहून रामायण, महाभारत आणि भगवतगीता यासह हिंदू धार्मिक ग्रंथ भारतात आणले आहेत.