देश

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, ‘हे’ फेसपॅक बनवा घरीच

Share Now

हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याची त्वचा अनेकदा कोरडी होते. योग्य काळजी न घेतल्यास त्वचा निर्जीव दिसते. त्वचेच्या ग्लोसाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. पण आज आम्ही हिवाळ्यात घरच्या घरी त्वचेला ग्लो आणण्याचे उपाय सांगणार आहोत. तुम्ही घरच्या घरी फेस पॅकच्या मदतीने त्वचेची काळजी घेऊ शकता.

आज होणार जगातील सर्वात उंच महादेव मूर्तीचे लोकार्पण, ३००० टन स्टीलने होणार तयार

त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी पपईचा फेस पॅक बनवा आणि ते चांगले स्वच्छ करा. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीसह अनेक गुणधर्म आहेत जे त्वचेसाठी चांगले आहेत. त्याचा पॅक तयार करण्यासाठी पपई आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. हा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात २ चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा आणि धुवा.

PM कुसुम योजना: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, (नवीन अर्ज) सौर पंप खरेदीवर 90% अनुदान, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

बेसनपासून फेसपॅक बनवण्यासाठी हळदही घ्या. हळदीचे औषधी गुणधर्म चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारचे डाग हलके करण्यास मदत करतात. एका भांड्यात 3 चमचे बेसन घ्या आणि त्यात 2 चिमूटभर हळद मिसळा. तुम्ही त्यात पाणी किंवा गुलाबपाणी घालून फेस पॅक तयार करू शकता. चेहऱ्यासाठी ग्रीन टी मास्क बनवण्यासाठी तुम्हाला ग्रीन टी लागेल. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात जे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करतात तसेच ती बाह्य आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे सुधारतात. हा फेस पॅक तुम्ही दोन चमचे ग्रीन टी, दही आणि खोबरेल तेलाचे थेंब घालून तयार करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *