लग्नाचा वाढदिवस नाही पश्चाताप दिनाची सुट्टी द्या, पोलीस अमलदाराचा विनंती अर्ज 

अमरावती : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या नावाप्रमाणे विनोदी सुट्टी अर्ज पोलीस आयुक्तांना दिला. विनोद राठोड असं या पोलीस अमलदाराचं नाव आहे. २९ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे २७ मार्चची साप्ताहिक रजा २९ मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती त्यांनी अर्जात केली आहे.

Read more