माझ्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण थांबवा , आम्हाला जगावं वाटतं नाही – दिशा सालियानच्या आईची विनवणी

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेले राजकारण थांबायला तयार नाही . दोघांच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ झाला आहे. . परंतु, अजूनही आरोप-प्रत्यारोपांची सुरूच आहे.

ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. यामुळे तणावात होती असेही पालकांनी स्पष्ट केले . आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईंनी उपस्थित केला.

दिशा सालियनच्या मृत्यूवरून भाजपचे चंद्रकांत पाटील, मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले होते. त्यातच आज भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. या साऱ्या प्रकाराला दिशाचे कुटुंबीय कंटाळले असून, तिच्या आईने तर आम्हाली जगावं वाटत नाही. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा, अशी विनवणी केलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *