राज्यातील सरकारी कर्मचारी या महिन्यात दोन दिवस संपावर
राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. निवृत्तीचे वय ६० वर्षे करावा आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या मागण्या मार्गी लावण्यात याव्यात यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी २३ आणि २४ फेब्रुवारी असे दोन दिवस संपाची हाक दिली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांसोबत सार्वजनिक बँकांच्या खाजगीकरण विषयी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात देशभरातील बँक कर्मचारी देखील २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी संप करणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय ?
*सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रानं लागू केलेली वाहतूक आणि इतर भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू व्हावेत.
* केंद्र आणि इतर राज्य क्रमांक सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे.
* विविध खात्यांचे भरती प्रक्रिया रखडलेली आहे त्या मार्गी लावण्यात याव्या.
* राज्यात अडीच लाखाहून अधिक रिक्त पदे कंत्राटी पदाने न भरता नियमित वेतन श्रेणी वर भरण्यात यावी
* पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात खंड दोन अहवालाची अंमलबजावणी करावी
* सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेड पे ची सातव्या वेतन आयोगा मार्फत एस २० मर्यादा काढावी.