एसटी कामगारांचे आंदोलन आता आझाद मैदानातून सीएसएमटी स्थानकावर …

उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.

आंदोलकांनी जोरदार निदर्शने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. दीड तासाच्या चौकशीनंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना रात्री दहाच्या सुमारास कट रचणे, सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांखाली अटक करण्यात आली. त्यांना रात्री वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

आझाद मैदानावर संप करत असलेल्या कामगारांना देखील पोलिसांनी धुडकावून लावल्याचा आरोप संपकरी आंदोलकांनी केला आहे. त्याचबरोबर आम्हाला सिएसएमटी (CSMT) स्थानकात सोडण्यात आले परंतु पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत एसटी एसटी कर्मचारी जखमी झाले असून काही कर्मचारी गायब असल्याचा खळबळ जनक आरोप संपकरी कामगारांनी केला आहे.

जो पर्यंत आमचे सहकारी येणार नाहीत तोवर आम्ही आम्ही स्थानकाबाहेर जाणार नाही, अन्यथा पोलिसांनी आम्हाला आझाद मैदानावर पुन्हा सोडावं अशी भूमिका संपकरी कामगारांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *