एसटी कर्मचारी कामावर परतण्यास सुरवात
एसटी महामंडळातील कर्मचारी जवळपास 6 महिने झाले विलीनीकणा च्या मुद्द्यावर संपावर होते, मात्र आता कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून १५ हजार कर्मचारी कामावर आले आहेत. चार दिवसात एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. कामावर रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं असे परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
हे वाचा : पतीनेच पत्नीचा केला खून, मग केला असा बनाव कि पोलीस हि झाले परेशान
सोमवारी १५ हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, एसटी कामगारांच्या संपानंतर ८२ हजार १०८ कर्मचाऱ्यापैकी ६१हजार ६४७ कर्मचारी कामावर रुजू झाले असून २० हजार ४७१ कर्मचारी अजूनही कामावर आले नाहीत. यात प्रशासकीय १२ हजार ६, कार्यशाळा १५ हजार ७८१, चालक २९ हजार ४८५ तर वाहक २४ हजार ८२६ कर्मचारी हजर आहेत.