गुरु शिष्याच्या नात्याला गालबोट, तरुणीवर केला कोचने बलात्कार
डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. एका स्पोर्ट्स कोचने विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला अमानुष मारहाण केली असून. याबाबत पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, मानपाडा पोलिसांनी या कोचला बेड्या ठोकल्यात. रामेश्वर पाठक असे संशयित आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा : मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, ठाकरे सरकारची भूमिका
डोंबिवलीत राहणारी २७ वर्षीय पीडित तरुणी २०१२ साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने त्या तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. काही कालावधीनंतर दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण शिवीगाळ करायचा. या तरुणीला रामेश्वर याने 18 मार्च 2022 रोजी डोंबिवलीत रॉडने अमानुष मारहाण केली. असा आरोप आहे. या मारहाणीत पीडित तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला.
पीडित तरूणीला अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. अखेर या तरुणीने एका सहकाऱ्याच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून. यानंतर मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक याच्याविरोधात बलात्कार, गंभीर मारहाण यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला, त्याला आज न्यायालयात हजर केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. परंतु, गुरू शिष्याच्या नात्याला या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबाबत परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत असून. या घटनेचा योग्य तपास करून दोषीला जास्तीत-जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.