क्राईम बिट

बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन, फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी , सरकारचे आदेश

Share Now

बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत . तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

विमानात प्रवाशांशी भांडण, महाराष्ट्रातील विमानतळावर महिलेचे हायप्रोफाईल ड्रामा

बदलापूरच्या दुर्दैवी घटनेतील आरोपीला २४ तासांत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संस्थेचीही चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आज प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जन्माष्टमीला तुळशीच्या पानांनी करा ‘हा’ उपाय, लक्ष्मी-नारायण होतील प्रसन्न

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
सीएम शिंदे म्हणाले, मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, आरोपीला अटक करण्यात आली आहे, जो कोणी आरोपी असेल त्याला कडक शिक्षा दिली जाईल. मी POCSO अंतर्गत कलमे लावण्यास सांगितले आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल. आरोपींना कठोर शिक्षा होईल. याप्रकरणी विशेष पीपी नेमण्यास सांगितले आहे. संस्थेच्या चालकांचीही चौकशी करू आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू. कर्मचाऱ्यांना कामावर ठेवताना संस्थात्मक व्यवस्थापकांनी पार्श्वभूमी तपासणे देखील आवश्यक आहे, तसे न केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.

बिहारच्या पटना विमानतळाच्या धावपट्टीवरील साप आणि मुंगुसांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, यात कोणी पोलीस दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही. शाळा प्रशासनाकडून केवळ माफीनामाच जारी करण्यात आला आहे. मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा करार रद्द करण्यात आला आहे. शाळेने सर्व पालकांची जाहीर माफी मागितली आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *