१२ ते १४ वयोगटातील मुलांचं लसीकरण कधी पासून ? केंद्र सरकारच स्पष्टीकरण
भारतात वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यावर भारत सरकारने नवीन वर्षाच्या सुरवातीलाच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केलंय मात्र आता वय वर्ष १२ ते १४ वयोगातील मुलांचे लसीकरण कधी सुरु होईल या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मार्च महिन्यात १२ ते १४ वयोगातील मुलांचे लसीकरण सुरु होईल अशी चर्चा देखील होत होती. ,मात्र यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या मुलांच्या लसीकरणावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतातील १५ ते १८ वयोगटातील जवळपास साडेतीन कोटी पेक्षा जास्त मुलांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले आहे.
#COVID19 | No decision yet by the union health ministry on vaccination for children of age group 12-14 years: Official sources pic.twitter.com/gUUmIEWSIp
— ANI (@ANI) January 18, 2022
"Over 3.5 crore children between the 15-18 age group have received the first dose of COVID-19 vaccine, since 3rd January," tweets Union Health Minister Dr Mansukh Mandaviya
(file photo) pic.twitter.com/PkAiQ1NtJy
— ANI (@ANI) January 17, 2022