newsमहाराष्ट्रराजकारण

‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरण | अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवस पोलीस कोठडी, तर १०९ जनांना न्यालयीन कोठडी   

Share Now

संपकरी एसटी कामगारांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केले होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. सिल्वर ओक बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे होते. असेच आंदोलकांकडून न्यायालयात त्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील काळ रात्री ८ वाजेच्या सुमारास  अटक करण्यात आली होती,

यावर आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते, सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान म्हटलं होतं की, वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्या, आरोपीवरील कलम गंभीर आहेत. त्यांनी कामगारांना भडकावलं. आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असं न्यायाधीशांनी म्हटलं. तसेच सदावर्ते यांची बाजू अॅड महेश वासवानी यांनी मांडली.

अॅड. सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते पीएचडी आहेत. जयश्री पाटील ह्या देखील पीएचडी आहेत.  मराठा आंदोलन सदावर्ते यांनी रद्दबातल केलं. सोबतच त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.  सदावर्ते हे बार काऊन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उचलला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात.  कोणत्याही सत्ताधारी राज्यकर्त्यांनी त्यांना विचारलं नाही.  एका सुपरस्टारच्या मुलाला अटक होते आणि सर्व त्यावर बोलायला लागतात, असं सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांनी म्हटलं.

दरम्यान न्यायालयाने पुढील चौकशी साठी सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, इतर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *