क्राईम बिटमहाराष्ट्र

सिद्धू मुसेवाला नंतर कारण जोहर होते पुढील टार्गेट? सौरभ महाकलचा मोठा खुलासा

Share Now

सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल यांच्या इतके नंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे, पुण्यातील ग्रामीण भागातील गुंड सौरभ महाकाल आणि संतोष जाधव यांनी या नंतर सरळ बॉलिवूडला निशाणावर घेण्याच्या तयारीत होते, सुप्रसिद्ध निर्माते कारण जोहर यांना देखील सौरभ महाकाल आणि संतोष जाधव खंडणी मागणार होते अशी माहिती समोर येत आहे.

५०० रुपयांची ही जुनी नोट उघडणार नशिबाचे दरवाजे

संतोष आणि सौरभ हे मूळचे पुण्यातील मंचर तालुक्याचे, त्यांनी कुख्यात गुंड राण्या बाणखेले याचा खून करण्याआधी स्टेट्स टाकून ‘सूर्य उगवतच तुला संपवणार’ अशी धमकी दिली आणि त्याचा खुनही केला त्यांनतर ते खूप दिवस फरार होते, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या खून प्रकरणात आठ संशयीतांचे फोटो पंजाब पोलिसांनी प्रसिद्ध केले, त्यावेळी पुणे पोलिसांनी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल या आठ फोटोत आहे हे समजले आणि त्याचा शोध सुरु झाला, तसेच त्या दोघांना अटकही झाली. सौरभ नारायणगाव येथून तर संतोष राजस्थान कच्छ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून अनेक गौप्य स्पॉट झाले, जसे खलिस्थानी संघटनांचा मुसेवाला प्रकरणातील हस्तक्षेप, सलमान खान प्रकरण आणि आता थेट कारण जोहर यांना ते खंडणी मागणार होते असेही समजत आहे.

PM किसान योजना: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, PM किसान चा पुढचा हप्ता ‘या’ महिन्यात येणार !

दरम्यान, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात येथील कच्छमधून अटक केली. संतोष जाधवसोबत सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने सुरक्षेच्या कारणास्तव संतोष जाधवला पुण्यातील खेडमधल्या राजगुरुनगरच्या लॉकअपमध्ये हलवलं असून. आज सकाळीच त्याला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत चौकशीसाठी आणण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *