जळगाव शहरात घडली धक्कादायक घटना; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
जळगाव शहर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी घटना घडली आहे. मेहरूण परिसरात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर पहाटे चार वाजता गोळीबार करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
कन्नडमध्ये संजना जाधव यांचे भावनिक भाषण; नवराच्या त्रासाचा केला खुलासा
जळगाव शहरातील महाविकास आघाडी, महायुती आणि इतर २९ उमेदवार यांच्यात चुरशीची लढत असल्याने तणाव वाढला आहे, आणि गोळीबारामुळे आणखी चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस फोर्स तैनात करण्यात आले असून, अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांना पोलीस संरक्षण दिलं जाणार आहे. घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली असून, सामाजिक प्रतिष्ठित लोकही पोलीसांशी संवाद साधत आहेत.
Exclusive: Ground Report & Analysis मध्य -छत्रपती संभाजीनगर!
या घटनेच्या संदर्भात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनेचा तपास सुरू केला आहे. गोळीबाराचा नेमका कारण आणि कृत्य करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे, तसेच लवकरच याबाबत अधिक माहिती मिळवण्याची अपेक्षा आहे.
Latest:
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.
- शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी या 6 सुधारित वाणांचा वापर करावा, पुसा येथून बियाणे मागवण्यासाठी याप्रमाणे नोंदणी करा
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर