सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता, आता कोण होणार नगराध्यक्ष?
औरंगाबाद : जिल्यात २१ डिसेंबर रोजी झालेल्या सोयगाव नागरपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तर अशी लढत पाहायला मिळाली. सत्तर यांचा या ठिकाणी विजय झाला. या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. कारण एक राज्य मंत्री तर एक केंद्रीय मंत्री या लढतीत आमने सामने होते.
११ जागेवर शिवसेना तर ६ जागेवर भाजप असा निकाल आला आहे. निकाल नुसार शिवसेनेने इथे बाजी मारली आहे. सत्तार आणि दानवे हे पारंपरिक राजकीय विरोधक जरी असले तरी व्यक्तिगत जीवनात चांगले मित्र असल्याचे नेहमी दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी सत्तार दानवेंनी दिल्ली येथे भेटीला गेले होते. त्यावेळी हे शिवसेना आणि भाजप युतीचे संकेत नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
दरम्यान, हि निवडणूक दोन टप्पयात झाली होती, पहिल्या टप्प्यात १३ तर दुसऱ्या टप्प्यात ४ जागेंसाठी हि निवडणूक झाली. आता नगराध्यक्षय पदासाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात सारीपाटाचा डाव रंगणार आहे. आता सर्व जनतेचे लक्ष सोयगावचे नगराध्यक्ष पद कुणाकडे जाते अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.