राजकारण

गोवा आणि उत्तरप्रदेश दोन राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार ? संजय राऊत याचा खुलासा

Share Now

निवडणूक आयोगाने(election commission) आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा  या पाच राज्यांत (assembly election 2022)निवडणूक जाहीर केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी काही निर्बंध आणि नियमावली जाहीर केली आहे.

यावर शिवसेना खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत(sanjay raut) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. “पूर्ण तयारीनिशीच हा निर्णय घेतला आहे. निवडणुका वेळेत होणं गरजेचं आहे. आयोगाला खात्री पटली आहे की देशात करोना नष्ट झाला आहे. जाहीर सभांमधून तो वाढणार नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.

गोवा आणि उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढण्याची आमची तयारी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत लढण्याची तयारी सुरु. असे संजय राऊत यांनी सांगितले. काँग्रेसने आमच्या बरोबर राहावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे, काँग्रेसला अजूनही वाटत आमच्या २२ जागा येतील त्याना शुभेच्या. आम्ही काही जागावर निवडणूक लढवणार आहोत.

निवडणूक आयोगाने जाहीर सभांवर, प्रचारावर, मिरवणुकांवर बंधनं घातली आहेत. ती बंधनं सर्वांसाठी असावीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत आम्ही ते पाहिलं आहे. दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना सगळ्याच राजकीय पक्षांनी त्या लाटेवर आरूढ होऊन कसे प्रचार केले. सत्ताधारी पक्षांनी, पंतप्रधानांनी, प्रमुख नेत्यांनी मोठ्या सभा घेऊ नयेत. पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमाचं पालनं केलं पाहिजे. पंजाबमध्ये जो प्रकार घडला, त्यानंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. लोकांचीही करोनामुळे चिंता वाटते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *