मंत्री संजय राठोडांनी पूजा चव्हाणचा खून केला शिवसेनेचा आरोप, ५६ मिनिटाची सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर करणार
सध्या महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलेच शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. शिंदेंसोबत एकूण ३९ आमदार आहे. त्यातील आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड हे दिखील आहे, संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी खटला सुरु आहे. पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनैतिक संबंध होते असे देखील आरोप अनेक वेळा त्यांच्यावर झाले आहे. तसेच पूजाने अत्यंहत्या नाही तर तिची हत्या झाली असेही विरोधक त्यांच्यावर आरोप करत होते आणि शिवसैनिक त्यांचा बचाव करत होते. आता मात्र काहीसे उलटे घडताना दिसत आहे.
माजी वनमंत्री आणि आमदार संजय राठोड हे येवतमल येथून निवडून आले आहेत. त्यांनी बंडखोरी केल्यापासून त्यांच्यावर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी आरोप केले आहे. ते म्हणले, संजय राठोड यांनी एका बंजारा समाजाच्या मुलीची हत्या केली आहे. पूजा चव्हणला संजय राठोडांनी जीवेमारले तसे आमच्याकडे पुरते आहे. ५६ मिनिटाची सीसीटीव्ही फुटेज असलेली सीडी आम्ही पुरावा म्हणून सादर करू” असे ते म्हणले. पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीला मारून त्यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली आहे. पूजा चव्हाणवर त्यांनी कसे अत्याचार केले हे आम्हाला माहित आहे. या प्रारणाचा आम्ही लवकरच पारडं फाश करू असेही ते म्हणाले.
काय आहे पूजा चव्हण प्रकरण?
पुणे शहरातील वानवडी परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पूजा चव्हाण असं या तरूणीचं नाव होतं. सोशल मीडियावर ‘टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील माजी मंत्री संजय राठोडांचं नाव समोर आलं होत. तसेच त्यांनी या प्रकरणावरून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता.