सोशल मीडियाच्या ‘या’ पोस्ट मुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी केली एक व्यक्तीला मारहाण

जळगाव : जळगावमध्ये एका व्यक्तीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात घडला.

धरणगाव येथील हेमंत द्वितीये यांनी सोशल मीडियावरील जळगाव शहरातील एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर हेमंत हे चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हेमंत यांच्यावर पाळत ठेवली. चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांना चित्रपटगृहाबाहेर गाठले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

हेमंत यांनी केलेल्या पोस्ट संदर्भात त्यांच्याकडून कार्यकर्त्यांची माफी मागितली. “माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. त्याबद्दल मी माफी मागतो” असं म्हणत हेमंत यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सोडून दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *